breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: युरोपमध्ये ९० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू
![Corona victims in the state crossed the one lakh mark; More than half died in the second wave](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/dead_body_1563537295-1.jpg)
करोना विषाणूने युरोपमध्ये आतापर्यंत ९० हजारांहून अधिक बळी घेतले असून, ही संख्या जगभरातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या ६५ टक्के इतकी आहे.
युरोप हा करोना महासाथीचा सर्वाधिक फटका बसलेला खंड ठरला आहे. येथे कोविड-१९ विषाणूचा १० लाख ४७ हजार २७९ लोकांना संसर्ग झाला असून, ९० हजार १८० लोक मरण पावले आहेत.
जगभरात करोना विषाणूने १,४२,७०७ बळी घेतले आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने देशोदेशांतील अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी दिली आहे.