breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#CoronaVirus: मिरजेत १२ तासांत कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू
इस्लामपूर आणि आसपासच्या परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढू लागताच शासकीय यंत्रणा जागी झाली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात स्वतंत्र ३१५ खाटांचे कक्ष १२ तासांत सुरू करण्यात आले. या रुग्णालयाचा कार्यभार सध्या मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून मंगळवारपासून या ठिकाणी करोना विषाणू तपासणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली.