breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावात दिवसभरात आढळले ३२ नवे कोरोनाबाधित रुग्ण
मालेगावात आज दिवसभरात ३२ नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय आणखी दोन आधीच्या बाधित रुग्णांची दुसऱ्यांदा घेतलेली चाचणी सकारात्मक आली आहे. नवीन बाधित रुग्णांमध्ये दाभाडी येथील एकाचा समावेश आहे.मालेगाव तालुक्यातील बाधितांची संख्या आता ४४१ झाली आहे.