breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावातील कोरोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३२५
मालेगाव- मालेगावात नव्याने 27 करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोना बाधितांची संख्या आता ३२५ झाली आहे. आज 128 अहवाल प्राप्त झाले त्यात 91 नकारात्मक आले असून 37 अहवाल सकारात्मक आहेत. या सकारात्मक अहवालांमध्ये दहा अहवाल हे जुन्या रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे आहेत.