#CoronaVirus | बीड जिल्हा झाला कोरोनामुक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/CoronaVirus-2.jpg)
बीड| जिल्ह्यतील पिंपळा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारानंतरचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे .यामुळे बीड जिल्ह्यात कोरोना पुन्हा शुन्यावर आला असून जिल्हावासीयांसाठी हा मोठा दिलासा आहे .त्या रुग्णावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते . बीड जिल्ह्यात कोरोनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्याजात असल्याने अनेक दिवस जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता मात्र आष्टी तालुक्यातील पिंपळा गावातील एका रुग्णाला नगर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली त्याच्यावर अहमदनगरच्या रुग्णालयातच उपचार सुरु होते मात्र यामुळे बीड जिल्ह्याचाही समावेश कोरोना रुग्ण असलेल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आला होता.
या एका रुग्णामुळे बीड जिल्हा ऑरेन्ज झोनमध्ये गेला सदर रुग्णावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते . १४ दिवसांच्या उपचारानतर बुधवारी त्याचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला तर आज त्याचा स्वब दुसऱ्यांदा घेण्यात आला होता त्याचाही अहवाल काही वेळापूर्वी रात्री निगेटिव्ह आल्याची माहिती बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी दिली यामुळे आता बीड जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण राहिला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक धोरात यानी जाहीर केले आहे.