breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus| पाकिस्तानची भारताला साथ ; व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी

नवी दिल्ली | जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क देशाच्या सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. सार्क देशांच्या बहुतांश सदस्यांनी मोदींच्य आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतु, पाकिस्तानने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

त्यामुळे जगभरातील माध्यमांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते. अखेर पाकिस्तानने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला पाठिंबा दिला असून या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. या विषाणूमुळे जगभरातून ५००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सामूहिकरित्या प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button