Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus |पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी आणि मुलीची आत्महत्या

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. पण तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊमध्ये काही नियम शिथिल करण्यात आले आहे. सरकारने दारू विक्री करण्यास परवानगी दिली आहे. याचदरम्यान स्त्रियांवरील वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

आंध्र प्रदेशमधील चितूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नी नंदनी आणि मुलगी जगधा यांनी दारूमुळे आपले जिवन संपवले आहे. सोमवारी नंदनीचा पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्याने पत्नीसोबत भांडण केले. पती सततच्या जाचाला कंटाळून नंदनी आणि जगधाने स्वतःचे आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसले आहे. घडल्या घटनेनंतर जिल्ह्यातील इतर स्त्रियांनी दारू विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली . परिस्थितीचा अंदाज घेत स्थानिक पोलिसांनी परिसरातील तीन दारूची दुकानं बंद केली आहेत. दरम्यान, जगभरात जसजसा लॉकडाऊन लागू होऊ लागला तसतशा स्त्रियांवरील वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button