breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिकमध्ये दररोज शंभरच्या आसपास रुग्णांची भर
!["The third wave of corona has hit Nagpur"; Guardian Minister warns Nagpurkars, says](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/200320110619-coronavirus-animation-super-tease-1.jpg)
नाशिक: नाशिकमध्ये दिवसागणिक शंभरच्या आसपास रुग्ण शहरात आढळून येत असल्याने, आता प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. शहरातील अनेक भागात आता कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे पंचवटी परिसरही आता कोरोना हॉटस्पॉट बनल्याने, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. मात्र जर कोणाला लक्षणे आढळून आल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्या, असं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केलेलं आहे.