#CoronaVirus | देशात कोरोनाबाधितांचा आकडा 400 पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
मुंबई | महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या 433 झाली आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात 50 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. आज (23 मार्च) भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 415 इतकी झाली आहे. यात देशभरातील सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईत सर्वाधिक 39, पुणे 16, पिंपरी चिंचवड 12 रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 67 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत 30 आणि उत्तरप्रदेशात 25 कोरोनाग्रस्त रुग्ण पाहायला मिळत आहे.