#CoronaVirus | देशात कोरोनाचा नववा बळी, पश्चिम बंगालमध्ये एकाचा मृत्यू
![Corona's cry again across the country! 459 people lost their lives in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/corona-4th-death_202003390172.jpg)
कोलकाता । देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. आज (23 मार्च) पश्चिम बंगालमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 3, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये आज दुपारी 55 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. कोलकातामधील सॉल्टलेक या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेशनवर होते. मात्र दुर्देवाने आज त्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या मृत रुग्णांची कुठल्याही प्रकारची ट्रव्हल हिस्ट्री नव्हती. हा रुग्ण 13 मार्च रोजी सर्दी, ताप आणि घसा खवखवत असल्याकारणाने रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर 16 मार्चला त्यांना श्वास घेण्यास अडचणी होत आहे. यानंतर 19 मार्चला त्यांचा कोरोनाची लागण झाल्याचे उघ़ड झालं होतं.