#CoronaVirus: जगभरात १ लाख ६१ हजार २५१ जणांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/6-11.jpg)
पॅरिस: करोनामुळे जगभरात रविवापर्यंत १ लाख ६१ हजार २५१ जणांचा मृत्यू झाला असून १९३ देशांमध्ये २३ लाख ४९ हजार ५३१ हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे, त्यापैकी पाच लाख १८ हजार ९०० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथील मृतांची संख्या ३९ हजार ९० वर पोहोचली आहे, तर सात लाख ३५ हजार २८७ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर किमान ६६ हजार ८१९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
इटलीमध्ये आतापर्यंत २३ हजार २२७ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ७५ हजार ९२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. स्पेनमध्ये २० हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ९५ हजार ९४४ जणांना लागण झाली आहे. फ्रान्समध्ये १९ हजार ३२३ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख ५१ हजार ७९३ जणांना लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये १५ हजार ४६४ जणांचा मृत्यू झाला असून एक लाख १४ हजार २१७ जणांना लागण झाली आहे.