breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: चोवीस तासात मालेगावात ८२ रुग्ण आढळले; अनेक पोलिसांचाही समावेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona_505_150220041149.jpg)
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर करोनाबाधितांचं हॉटस्पॉट बनलं आहे. दिवसेंदिवस इथं रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मालेगाव शहरात करोनाचे ८२ नवीन रूग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे करोनाबाधित रुग्णांमध्ये कर्तव्यावर असलेल्या बऱ्याच पोलिसांचाही समावेश आहे.