breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: चिंताजनक! रविवारी एका दिवसात कोरोनाच्या ५ हजार नव्या रुग्णांची नोंद, १५४ मृत्यू

देशात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. लॉकडाउनची उपायोजना करुनही या व्हायरसवर अद्यापी नियंत्रण मिळवता आलेले नाही. रविवारी देशभरात ५ हजार नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. काल लॉकडाउन 3.0 चा शेवटचा दिवस होता.

आजपासून लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. करोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या महाराष्ट्रात एकाच दिवशी २३४७ नवीन करोना रुग्ण सापडले आहेत. रविवारी करोना व्हायरसमुळे १५४ जणांचा मृत्यू झाला. करोनामुळे एकाचदिवशी झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.

करोनामुळे आतापर्यंत भारतात ३ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. रविवारी महाराष्ट्रात करोनामुळे ६३ मृत्यू झाले. एकटया मुंबईत ३८, गुजरातमध्ये ३४ आणि दिल्लीत १९ जणांचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button