breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: चंद्रपूरच्या कोरोना रुग्णाला नागपूरला हलविले; पत्नी, मुलांची चाचणी निगेटिव्ह
![The peak of daily morbidity; 81 thousand 466 patients registered in last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-new-3.jpg)
जिल्ह्यामध्ये फक्त एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे. या रुग्णाला कोविडशिवाय अन्य आजाराच्या विशेष तपासणी करीता सायंकाळी नागपूरला हलविण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील ४४ नागरिकांचे स्वॅब नागपूरच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्यांपैकी २४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये रुग्णाची पत्नी, मुलगी व मुलाचा अहवाल देखील निगेटिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.