breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांना मिळणार दिलासा?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/1583952355.1997-1.jpg)
१४ एप्रिल रोजी लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारनं त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याची घोषणा केली होती. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपत आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढत आहे. दुसरीकडं आर्थिक संकटही डोकं वर काढायला लागलं असून, ३ मे नंतर काय होणार याकडे देशवासीयांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर चित्र काही प्रमाणात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.