breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणे लांछनास्पद- डोनाल्ड ट्रम्प

जॉर्ज फ्लॉइड या आफ्रिकी अमेरिकी व्यक्तीच्या पोलीस अत्याचारातील मृत्यूनंतर करण्यात आलेल्या निदर्शनावेळी म.गांधी यांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करण्याचा प्रकार लांछनास्पद आहे, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारतीय दूतावासानजीक असलेल्या या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला होता. त्याचे विद्रूपीकरण करण्यात आल्याची घटना २ ते ३ जूनच्या रात्री झाली होती. त्यामुळे भारतीय दूतावासाने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

म.गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार लांछनास्पद आहे, असे मत ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये या प्रकाराबाबत व्यक्तकेले. भारतीय दूतावासाने याबाबत अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाकडे तक्रार करून याबाबत चौकशीची मागणी केली होती.

दरम्यान ट्रम्प यांच्या प्रचारगटातील अनेकांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला. ट्रम्प यांचे सल्लागार किंबर्ले गलीफॉयल यांनी सांगितले की, ही घटना अतिशय निराशाजनक  व उद्विग्न करणारी होती. उत्तर कॅरोलिनाचे सिनेटर टॉम टिलीस यांनी सांगितले, गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना ही लांछनास्पद आहे. सिनेटर मार्को रुबियो यांनी म्हटले आहे, हिंसक मूलतत्त्ववाद्यांनी या आंदोलनात घुसखोरी करून त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अराजक माजवण्याचा प्रयत्न केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button