breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | कोरोनाच्या संकटात पाकच्या अडचणी वाढल्या

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक दिग्गज देश मेटाकुटीला आहेत. अशातच कोरोनाचा शिरकाव झालेल्या पाकिस्तानची अवस्था तर खूपच बिकट झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती लक्षात घेता लॉकडाऊन करणं शक्य नाही, असा निर्णय पाकच्या पंतप्रधानांनी घेतला. त्यानंतर आता पाकिस्तानमधील डॉक्टरांच्या एका संघटनेने बहिष्कार टाकत सेवाच बंद केली आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांवर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये लाठीचार्ज करण्यात आला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सेफ्टी किट सर्व डॉक्टरांना देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी युवा डॉक्टर आणि पॅरा मेडिकल कर्मचाऱ्यांनी क्वेटामध्ये आंदोलन केले. मात्र, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ ‘यंग डॉक्टर्स असोसिएशन’ने रुग्णालयातील सेवेवर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button