breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश
करोनासंदर्भातील १५ व्या मंत्रिगटाची बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाळेबंदीमुळे करोनाच्या रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण ३.४ दिवस होते पण, आता ते १२.९ दिवसांवर पोहोचले आहे.