breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोनाचे जगभरात आतापर्यंत ३४ हजार ६१० बळी

करोनाची लागण झाल्याने जगभरात आतापर्यंत ३४ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोनतृतीयांशहून अधिक जणांचा युरोपमध्ये मृत्यू झाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

जगभरातील १८३ देशांमध्ये एकूण सात लाख २७ हजार ०८० जणांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी एक लाख ४२ हजार ३०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.

इटलीमध्ये करोनामुळे फेब्रुवारी महिनाअखेरीस एकाचा मृत्यू झाला, मात्र इटलीमध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १० हजार ७७९ इतकी झाली आहे. तर एकूण ९७ हजार ६८९ जणांना लागण झाली असून १३ हजार ३० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.

स्पेनमध्ये सात हजार ३४० जणांचा करोनामुळे बळी गेला असून त्यामध्ये गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्या ८१२ जणांचा समावेश आहे आणि ८५ हजार १९५ जणांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारपासून स्पेनमध्ये दिवसभरात घेतलेल्या बळींचा संख्या प्रथमच कमी झाली असून इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. स्पेनमध्ये  १४ मार्चला टाळेबंदी लागू करण्यात आली असून त्यात लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले आहे.

चीनमध्ये रविवारपासून ३१ जणांना करोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

इराणमध्ये आतापर्यंत दोन हजार ७५७ जणांचा मृत्यू झाला असून ४१ हजार ४९५ जणांना करोनाची लागण झाली आहे आणि फ्रान्समध्ये दोन हजार ६०६ जणांचा मृत्यू झाला असून ४० हजार १७४ जणांना लागण झाली आहे.

अमेरिकेमध्ये सर्वाधिक म्हणजे एक लाख ४३ हजार ०५५ जणांना करोनाची लागण झाली असून आतापर्यंत दोन हजार ५१४ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या आठवडय़ात ४१ हजार ५११ जणांना करोनाची लागण झाली होती, मात्र या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

युरोपमध्ये तीन लाख ९६ हजार ०२७ जणांना लागण झाली असून आतापर्यंत २४ हजार ८४१ जणांचा मृत्यू झाला आहे, आशियात एक लाख सहा हजार ५५२ जणांना लागण झाली असून आतापर्यंत तीन हजार ८२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य-पूर्वेत ५० हजार ६४३ जणांना लागण झाली असून आतापर्यंत दोन हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button