#CoronaVirus: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
ग्वालियर: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अद्यापही रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. त्यात देशातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. त्यात एक दु:खद घटना समोर आलेली आहे. मध्यप्रदेशचे काँग्रेस नेता बृजमोहन परिहार यांचं निधन झालेलं आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे. परिहार हे प्रदेश काँग्रेस कमिटीत उपाध्यक्ष पदावर होते. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मध्य प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बृजमोहन परिहार यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र संक्रमण वाढल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना वाचवता येऊ शकलेलं नाही. त्यांनी मंगळवारी शेवटचा श्वास घेतला आहे. सरकार आणि WHO च्या कोरोना गाइडलाइननुसार दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री शिवराज यांनी वाहिली श्रद्धांजली
CM शिवराज सिंह चौहान यांनी बृजमोहन परिहार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलेलं आहे की मध्य प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बृजमोहन परिहार यांच्या निधनाचं वृत्त कळालं, त्यांच्या आत्मास शांती लाभो ही ईश्वराकडे प्रार्थना. त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगात शक्ती मिळो.
मध्य प्रदेश के कांग्रेस के प्रदेश उपाध्यक्ष श्री बृजमोहन परिहार जी के निधन का दुखद समाचार मिला।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) August 11, 2020
ईश्वर से दिवंगत आत्मा की शांति और परिजनों को यह दु:ख सहन करने की शक्ति देने की प्रार्थना करता हूं। विनम्र श्रद्धांजलि!