#CoronaVirus | औरंगाबादेत नवे 74 रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 823 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus_505_120220063825_150220062439-2.jpg)
औरंगाबाद | शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पुन्हा नव्या 74 रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता शहरातील कोरोनाग्रस्तांनी आठशेचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 823 वर गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील 229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1) , शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.