Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronaVirus | औरंगाबादेत कोरोना बाधितांचा आकडा 500 पार
औरंगाबाद | शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना आहे. आज सकाळीही 17 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 500 च्या घरात गेली आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही 495 वर केली आहे. यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. काल एकाच दिवशी सकाळी अचानक 90 कोरोना रुग्णांची वाढ झाली.
आता नवे सापडलेले रुग्ण हे संजयनगर 6, कटकट गेट 2, बाबर कॉलनी 4, असेफीया 1, भवानीनगर 2, रामनगर (मुकुंदवाडी) 1, सिल्क मिल्क कॉलनी 1 या परिसरातील आहेत. तर शुक्रवारी अचानक 100 कोरोना रुग्ण शहरात वाढले होते.