Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronaVirus | औरंगाबादेत आज कोरोनाचे 55 नवे रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona_505_150220041149.jpg)
औरंगाबाद | शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. आज सकाळी पुन्हा नव्या 55 रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता औरंगाबाद शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 743 वर पोहोचला आहे. यामुळे शहराची चिंता ही वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोना व्हायरसमुळे शहरातील 18 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 210 जण हे कोरोनामुक्त झाले आहे. मात्र तरीही झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही औरंगाबादकरांची चिंता वाढवणारी आहे.