breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: एका दिवसातील बाधितांचा उच्चांक; किमान २५ टक्के बाधित तबलीगी मरकजशी संबंधित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Tablighi-1-1.jpg)
गेल्या तीन दिवसांतील करोनाबाधितांची देशातील संख्या १,२५१ वरून दुप्पट वाढून तीन एप्रिलपर्यंत २,५४७ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी तब्बल २५ टक्के बाधितांचा संबंध गेल्या महिन्याच्या अखेरीस झालेल्या तबलीगी मकरजशी आहे. गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसातील सर्वाधिक बाधितांची ४७८ इतकी संख्या नोंदवली गेली. यापैकी किमान २४७ जणांनी मरकजला हजेरी लावली होती. दिल्लीतील तबलीगी मरकजमध्ये देश विदेशातून सुमारे ४,००० भाविकांनी हजेरी लावली होती.