breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus:नागपूर शहरात सीआरपीएफची तुकडी तैनात
नागपूर शहरात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 84 जवानांची तुकडी हॉटस्पॉट असलेल्या परिसरात तैनात केली आहे. गड्डीगोदाम, मोमीनपुरा, सातरंजीपुरा या हॉटस्पॉट झोनमध्ये पोलिसांच्या मदतीला जवान लावण्यात आले आहेत. ईद सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.