अमेरिकेत ५ ते ११ वयोगटातील ४० टक्के मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग
न्यूयॉर्क – कोरोना संसर्गाचा मुलांवरही घातक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार जूनपर्यंत ५ ते ११ या वयाेगटातील ४० टक्के मुले कोरोनाबाधित झाली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेत मुलांमधील संसर्गाचे प्रमाण यापुढेही आणखी वाढू शकते, असा इशाराही तज्ज्ञांच्या दुसऱ्या गटाने दिला आहे. काही तज्ज्ञांच्या मते सामान्यपणे तपासणीत पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या वाढत्या रुग्णांमुळे देखील ही संख्या जास्त असू शकते. पेनासेल्व्हिनियाचे स्कॉट हेनस्ले म्हणाले, मुलांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे किंमान मुलांना कोरोनाची लस दिली जाणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.
वयस्करांच्या तुलनेत मुलांमध्ये लसीची कुशलता दर वयस्करांहून जास्त असते. अमेरिकेत झालेल्या एका परीक्षणादरम्यान ५ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लसीचा कुशलता दर ९५ टक्क्यांपर्यंत आढळून आला. जगभरातील सुमारे ७० देशांत आतापर्यंत सुमारे २० टक्के लोकसंख्येला लस मिळाली आहे. चिली, चीन, क्युबा,इस्रायल,यूएईसारख्या देशांनी १२ पेक्षा कमी वयाच्या मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. नैसर्गिकदृष्ट्या रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या देशांतील मुलांना लस दिली जावी. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो.