TOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

दिवाळीच्या रात्री गुजरातमध्ये जातीय हिंसाचार

स्ट्रीट लाइट बंद करून दगडफेक

गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी दिवाळीच्या रात्री जातीय हिंसाचार झाला आहे. पानीगेट भागात काल सोमवारी मध्यरात्री १ च्या सुमारास २ गटांत झडप झाली. त्यानंतर तुफान दगडफेक झाली. दंगेखोरांनी स्ट्रीट लाइट बंद करून दगडफेक केली आणि अनेक वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांवरही पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले. सुदैवाने पोलीस यामधून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता आज सकाळी 19 जणांना अटक करण्यात आली आहे. या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. डीसीपी म्हणाले की, सीसीटीव्ही तपासले जात आहेत आणि प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दिवाळीची पूजा झाल्यानंतर पानीगेट मुस्लीम मेडिकल कॉलेजजवळ फटाके फोडले. यावरून वाद सुरू झाला. त्यानंतर एका पक्षाने स्ट्रीट लाइट बंद करून दगडफेक सुरू केली. तसेच समाजकंटकांनी रस्त्या शेजारी उभी असणारी वाहने आणि सामानांची जाळपोळ सुरू केली.

या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी वडोदरासारख्या शहरात असा हिंसाचार पोलिसांसाठी आव्हान मानला जात आहे. मात्र, डीसीपींनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button