Delhi : मेट्रोमध्ये हस्तमैथुन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात महिला आयोगाने बजावली नोटीस
![Commission for Women issues notice against person who masturbates in Delhi Metro](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/delhi-metro-780x470.jpg)
दिल्ली : काही दिवसांपुर्वी दिल्ली मेट्रो मध्यील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक युवक मेट्रोमध्ये हस्तमैथुन करत असल्याचं यामध्ये दिसत होते. दरम्यान, या प्रकरणाची दखल आता दिल्ली महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी DCP, दिल्ली मेट्रोला नोटीस बजावली आहे.
दिल्ली मेट्रोमध्ये हस्तमैथुन प्रकरण दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यामध्ये दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणारा एक तरुण हस्तमैथुन करताना दिसत आहे तर त्याच्या आजूबाजूचे इतर लोक लाजत आहेत आणि त्याच्यापासून लांब जात आहेत. त्यावर कठोर भूमिका घेत स्वाती मालीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली पोलीस आणि दिल्ली मेट्रोला या लज्जास्पद कृत्याविरोधात कठोर कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे.
एक व्हायरल व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक माणूस निर्लज्जपणे दिल्ली मेट्रोमध्ये हस्तमैथुन करताना दिसत आहे. हे पूर्णपणे घृणास्पद आणि त्रासदायक आहे. या लज्जास्पद कृत्याविरुद्ध शक्य तितक्या कठोर कारवाईची खात्री करण्यासाठी मी दिल्ली पोलिस आणि दिल्ली मेट्रोला नोटीस जारी करत आहे, असं स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये असभ्य कृत्य किंवा वर्तनाचा असा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच एका महिलेचा ब्रा आणि मिनीस्कर्ट घालून दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.