breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Cerberus: देशभरातील स्मार्टफोन युझर्सला Cerberus व्हायरसचा धोका; सीबीआयने जारी केला अलर्ट

स्मार्टफोन वापरणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयने देशभरातील राज्यांना एक इशाराच जारी केला आहे. यामध्ये सीबीआयने राज्यातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर (व्हायरस) लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने हा इशारा जारी केला आहे. करोनासंदर्भातील माहिती आणि लिंक असल्याचे सांगून अनेक स्मार्टफोनमधून सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनच्या माध्यमातून खासगी माहिती चोरली जात आहे. फिशींग (phishing) प्रकारच्या या सायबर हल्ल्याच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जाते असं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील इशारा मंगळवारी सीबीआयने जारी केल्याचे वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

करोनाच्या नावाखाली फसवणूक

मंगळवारी सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे अ‍लर्ट जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे. बँकिंगशी सबंधित सर्बेरस (Cerberus) या ट्रोजनसंदर्भात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. करोनामुळे जगभरामध्ये दहशत असल्याने याचा गैरफायदा काही हॅकर्स घेताना दिसत आहे. करोनासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण इंटरनेटवरील वेगवेगळे लेख आणि संशोधनासंदर्भातील लेख वाचत असल्याचे दिसून येत आहे. याच ट्रेण्डचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशातून सर्बेरसचा वापर केला जात आहे.

कसा पसरवला जातो हा व्हायरस

सर्बेरसच्या माध्यमातून करोनासंदर्भातील काही काही एसएमएस स्मार्टफोन युझर्सला पाठवले जातात. करोनासंदर्भात अधिक अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता स्मार्टफोन युझर्समध्ये आहे हे मागील काही महिन्यांच्या डेटावरुन स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनासंदर्भातील रंजक आणि महत्वाची माहिती असल्याचे भासवून अधिक वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास मेसेजमधून सांगितले जाते. हा मेसेज खोटा असून तो स्मार्टफोनसाठी धोकादायक आहे याबद्दल काहीही माहिती नसल्याने युझर्स या लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक करताच ट्रोजन स्मार्टफोनमध्ये इन्सॉटल होतो.

अज्ञात सर्व्हरवर जातो डेटा

सर्बेरस (Cerberus) हा ट्रोजन अंत्यत धोकादायक असल्याचे तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षेसंदर्भातील  ब्लॉगर्स सांगतात. सर्बेरस मोबाइलमध्ये इन्सटॉल झाल्यानंतर युझर्सची खूप सारी खासगी माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. युझर्सच्या खासगी डेटाबरोबर बाकी संवेदनशील माहितीही हॅकर्सच्या हाती लागण्याची शक्यता असते असं तज्ज्ञ सांगतात. हॅकर्स सर्बेरसच्या माध्यमातून माहिती चोरुन ती एका अज्ञात रिमोट सर्व्हरवर पाठवतात असंही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बँकींगसंदर्भातील माहितीला धोका

स्मार्टफोन युझर्सच्या बँकींगसंदर्भातील माहितीसाठी सर्बेरस खूप धोकादायक असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. “युझर्सच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात म्हणजेच क्रेडीट/डेबिट कार्ड डिटेल्स आणि इतर महत्वाची माहिती चोरण्याचे काम हा ट्रोजन करतो. अत्यंत हुशारीने हे हॅकर्स युझर्सची खासगी माहिती आणि टू स्टेप व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून माहिती चोरुन खासगी माहिती मिळवतात,” असं सीबीआयने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button