breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी

Kharif MSP | केंद्र सरकारने खरीप पिकासाठी एमएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयात एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने खरीप पिकासाठी एसएसपी (किमान आधारभूत किंमत) वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयात एकूण १४ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा चांगलाच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये कापसाच्या पिकापासून मूग डाळ, उडदाची डाळ, शेंगदाणे, मका यासारख्या पिकांच्या समावेश आहे. केंद्रीय सूचना प्रशासन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा    –      पुण्याच्या हिंजवडी आयटी परिसरातील समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा 

या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ खरीप पिकाच्या एमएसपी मध्ये वाढ केली आहे. तांदूळ पिकाची नवीन एमएसपी २३०० रूपये निश्चित करण्यात आली आहे. जो मागील एमएसपी पेक्षा ११७ रूपयांनी जास्त आहे. कापसाचा नवीन एमएसपी ७१२१ या अगोदर होता. त्यात वाढ करून नवीन एमएसपी ७५२१ रूपये केला आहे. जो पूर्वीपेक्षा ५०१ रूपयांनी अधिक आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे एमएसपी वाढल्याने सरकारचा सुमारे दोन लाख कोटी रूपये खर्च वाढणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात डीप ड्राफ्ट ग्रीन फिल्ड पोर्टलला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ७६ हजार २२० कोटी रूपयांच्या वाधवन बंधाऱ्याला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. अशा अनेक शेती हितासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतले आहेत.

असे आहेत एमएमसपीचे नवे दर (प्रति क्विंटलमध्ये )

  1. नाचणी – २४९० रुपये
  2. बाजरी – २६२५ रुपये
  3. सोयाबीन – ४८९२ रुपये
  4. मुग – ८६९२ रुपये
  5. तूर – ७५५० रुपये
  6. तिळ – ९२६७ रुपये
  7. भात – २३०० रुपये
  8. ज्वारी – ३३७१ रुपये
  9. उडीद – ७४०० रुपये
  10. कापूस – ७१२१ रुपये
  11. भुईमुग – ६७८३ रुपये
  12. रेप सीड – ८७१७ रुपये
  13. मका – २२२५ रुपये
  14. सूर्यफुल – ७२८० रुपये
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button