breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय! देशभरात सी टाइप चार्जर होणार अनिवार्य

One Nation One Charger | देशातील इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्याबरोबरच, चार्जर खरेदी करण्यासाठी सरकार युजरवर अतिरिक्त दबाव आणू शकत नसल्याने अशा परिस्थितीत सरकार लवकरच सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करण्यासाठी टाइप-सी चार्जिंग केबल अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.

या वर्षाच्या अखेरीस सी चार्जिंगचा नियम अनिवार्य होऊ शकतो. सरकारच्या अशा बदलांचा थेट परिणाम मोबाईल युजर्सवर होणार आहे. तसेच, सरकारच्या नवीन नियमांचा सर्वाधिक परिणाम स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांवर होणार आहे. एका देशात एकाच प्रकारचे चार्जर विकले जाणार असल्याने लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल फोनसाठी वेगळ्या चार्जरची गरज भासणार नाही.

हेही वाचा    –      जसप्रित बुमराह म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य; विराटकडून बुमराहचं कौतुक 

हा नवीन नियम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे. टाईप सी चार्जिंग अनिवार्य केल्याने ई-कचऱ्याची वाढ रोखता येईल. मोबाईल युजर्सना कमी चार्जर लागतील. त्यांना वेगवेगळ्या डिव्हाइसेससाठी वेगळे चार्जर शोधावे लागणार नाहीत.

भारतापूर्वी युरोपियन युनियनने टाइप सी चार्जिंग अनिवार्य केले आहे. हा नियम युरोपियन युनियनने २०२२ मध्ये लागू केला होता. मात्र, भारतात असा नियम अस्तित्वात नाही. तथापि, या वर्षाच्या अखेरीस सी चार्जिंगचा नियम अनिवार्य होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button