breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2020 : कररचनेत बदल, अडीच ते 5 लाखांवर 5 टक्के कर

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प म्हणजे आज 1 फेब्रुवारी रोजी सादर करत आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडत आहे. यावेळी अर्थमंत्र्यांसोबत असणाऱ्या बॅगबद्दल अनेकदा प्रश्न पडतात. सुरुवातील असलेल्या लेदर ब्रीफकेसची जागा आता खतावणीने घेतली आहे. भारतात ब्रीफकेसची परंपरा ब्रिटनमधून आलेली आहे.

मात्र. मागील वर्षी म्हणजे 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही परंपरा मोडली. अर्थसंकल्पाचे दस्तऐवज ठेवण्यासाठी त्यांनी लेदर ब्रीफकेसऐवजी खतावणीचा वापर सुरु केला.

एकूण कर आकारणी

  • उत्पन्न 0 ते 2.5 लाख – कोणताही कर नाही (आधीही कर सवलत)
  • उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के (आधीही 5 टक्के)
  • उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
  • उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के (आधी 30 टक्के)
  • उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)

बँक

  • सर्व शेड्यूल व्यावसायिक बँकांवर देखरेख करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यरत आहे आणि ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,
  • डिपॉझिट विमा 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांवर नेला. आतापर्यंत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच होतं, आता 5 लाखपर्यंत्च्या ठेवींवर असेल
  • IDBI बँकेतील सरकारी भागीदारी विकणार
  • PSU बँकांतील जागा लवकरच भरणार
  • सरकारी बँकांना बाजारातून भांडवल जमवण्यास मंजुरी
  • सहकारी बँकांना आणखी अधिकार देणार
  • MSME कर्ज पुनर्गठण योजना 1 वर्ष आणखी वाढवणार

रेल्वे, हवाई आणि जल वाहतूक

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणार
  • वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार
  • इंफ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या स्टार्टअपमध्ये तरुणांना संधी देण्याचं आवाहन
  • दिल्ली-मुंबई 6 हजार किमीचा एक्स्प्रेस वे लवकरच पूर्ण करणार
  • दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार
  • 2024 पर्यंत देशात नवे 100 विमानतळं उभारणार
  • 24 हजार किमी रेल्वेचं इलेक्ट्रानिक जाळं उभारणार
  • तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार
  • जलवाहतुकीला चालना देणार, हा मार्ग आसामपर्यंत वाढवणार
  • वाहतूक क्षेत्रात 1.70 लाख कोटी गुंतवणूक करणार

रेल्वे

  • तेजस एक्स्प्रेससारख्या आणखी काही ट्रेन पर्यटनस्थळांना जोडतील
  • 24 हजार किमी रेल्वेचं इलेक्ट्रानिक जाळं उभारणार
  • तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढवणार
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती देणार
  • वाहतूक व्यवस्था बळकटीसाठी मॉडर्न रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानके, लॉजिस्टिक सेंटर उभारणार

आरोग्य

  • आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटी, ‘फिट इंडिया’ला प्रोत्साहन देणार,
  • ‘आयुष्मान भारत’ अंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवणार,
  • 2025 पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचं लक्ष्य

शिक्षण

  • 2020-21 मध्ये शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटी रुपये आणि कौशल्य विकासासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद
  • प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
  • प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, ऑनलाईन डिग्री कार्यक्रम सुरु करणार
  • लवकरच नवं शिक्षण धोरण जाहीर करणार
  • जिल्हा रुग्णालयात आता मेडिकल कॉलेज बनवणार
  • तरुण इंजिनिअर्सना इंटर्नशिपची सुविधा
  • जगभरातील तरुणांना भारतात शिक्षणासाठी सुविधा देणार
  • भारतीय तरुणांनाही परदेशी शिक्षण सुलभ करणार
  • राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ, राष्ट्रीय कायदे विज्ञान विद्यापीठाचा प्रस्ताव
  • डॉक्टरांसाठी नवं धोरण ठरवणार, प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना व्यावसायिक शिक्षणाबाबत शिकवणार

प्रदूषण मुक्तीसाठी मोठं पाऊल

  • मोठ्या शहरातील स्वच्छ हवेसाठी 4400 कोटी
  • अतिरिक्त प्रदूषण करणारे औष्णिक विद्युत केंद्र बंद करणार
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button