Budget 2020 : अर्जाशिवाय काढता येणार आता पॅन कार्ड…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-5.png)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केलं… यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. नविन योजनाही आणल्या आहेत..मात्र त्यातही एक महत्त्वाची घोषणा म्हणजे आधार कार्ड असेल तर,आता पॅन कार्ड काढण्यासाठी वेगळा अर्ज भरावा लागणार नाही. आधार कार्डच्या साह्याने पॅन कार्ड काढता येणार आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभाग लवकरच एक नवी व्यवस्था आणत असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
निर्मला सीतारामन म्हणाल्या, आधार कार्डच्या आधारे करदात्यांच्या वैयक्तिक माहितीचा आढावा घेण्याची पद्धत प्राप्तिकर विभाग सुरू करणार आहे. करदात्यांचा विचार करून ही नवी व्यवस्था आणली जाणार आहे. त्याच व्यवस्थेत पॅन कार्ड हवे असलेल्या करदात्यांना वेगळा अर्ज करावा लागणार नाही. त्यांच्या आधार कार्डवरील माहितीच्या आधारे त्यांना पॅनकार्ड उपलब्ध करून दिले जाईल.
सध्या पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होण्यासही जास्त वेळ लागतो. अर्जदाराच्या माहितीचा आढावा घेऊन नंतर त्याला पॅन कार्ड जारी केले जाते. पण नव्या व्यवस्थेत केवळ आधार कार्डच्या साह्याने करदात्याला पॅन कार्ड दिले जाईल. त्यामुळे ते लवकर उपलब्ध होईल, याकडेही त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात लक्ष वेधले.
गेल्यावर्षीच प्राप्तिकराच्या कामांसाठी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड चालेल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्यासाठी ३१ मार्च २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे.