बिहारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह २२ टक्के कर्मचारी कोरोनाबाधित
पटना | टीम ऑनलाइन
बिहारमध्ये आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा असर दिसू लागला आहे. कारण बिहारच्या दोन्ही उप मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांच्या बंगला आणि कार्यालयातील २२ कर्मचारी कोरोन बाधित झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
कोरोना आता बिहार मध्ये झपाट्याने पसरत चालला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री किशोर प्रसाद आणि रेणू देवी हे दोघेही कोरोना बाधित झाले आहेत. अबकारी मंत्री सुनील कुमार व गृहनिर्माण मंत्री अशोक चौधरी यांचाही कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलण्यात आली. कोरोनाने राज्य मंत्रिमंडळात घुसखोरी केल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व मंत्र्यांना कोरोन चाचणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान दोन्ही उप मुख्यमंत्र्यांनी ट्विट अरुण सांगितले आहे कि त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोन चाचणी करून घ्यावी. सध्या बिहारमध्ये ६ ते २१ जानेवारीपर्यंत रात्री १० ते पाहते ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू आहे. तर पूजा स्थळ पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. रेस्तोरांत, हॉटेल्स धाबे केवळ ५०टक्के कॅपिसिटीसहच सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान येथील २२ टक्के कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने यातील काही जणांना रुग्णालयात तर काहीना होम क्वारटाईन करण्यात आले आहे.