नोकरदारांना मोठा हादरा; पीएफच्या व्याजात कपात
![Big shock to employees; Deduction of interest on PF](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/images-60.jpeg)
नवी दिल्ली | नोकरदारांना मोठा झटका बसला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदर ८.१ टक्के निश्चित केला आहे. ४० वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. गेल्यावर्षी ८.५ टक्के पीएफवर व्याज मिळाले होते. याचा फटका सुमारे ६ कोटी कर्मचाऱ्यांना बसला आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटनेची आज सकाळी बैठक झाली. त्यात २०२१-२२ या वर्षासाठीचा व्याजदर ठरवण्यात आला. तो ८.१ टक्के निश्चित केला आहे. ४० वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. याचा फटका देशातील सुमारे ६ कोटी कामगारांना बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफचा व्याजदर ८.५ टक्के होता. १९७७-७८ मध्ये पीएफचा व्याजदर ८ टक्के होता. त्यानंतर आता पीएफवर ८.१ टक्के व्याज मिळणार आहे. आतापर्यंत पीएफवर ८.६५ टक्के एवढा सर्वाधिक व्याजदर मिळाला होता.
चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने 1977-78 नंतर ईपीएफवर सर्वात कमी व्याजदर ठेवले आहेत. 1977-78 मध्ये भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8 टक्के ठेवण्यात आला होता. चालू आर्थिक वर्षासाठी गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. या व्याजदरात कपात केल्यानंतर पीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफवर कमी व्याज मिळेल.
EPF वर मिळत असलेले व्याजदर (वर्षानुसार)
आर्थिक वर्ष 15 – 8.75 टक्के
आर्थिक वर्ष 16 – 8.80 टक्के
आर्थिक वर्ष 17 – 8.65% टक्के
आर्थिक वर्ष 18 – 8.55 टक्के
आर्थिक वर्ष 19 – 8.65 टक्के
आर्थिक वर्ष 20 – 8.5 टक्के
आर्थिक वर्ष 21- 8.5% टक्के
आर्थिक वर्ष 22 – 8.10 टक्के