Big News : दक्षिण कोरिया राजकीय संकटात; राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर!
संविधान न्यायालयात ठरणार यून सूक येओल यांचे राजकीय भवितव्य
![Big News: South Korea in political crisis; Impeachment motion against President approved!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Big-News-South-Korea-in-political-crisis-Impeachment-motion-against-President-approved-780x470.jpg)
महाईन्यूज ऑनलाईन डेस्क: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्याविरोधातील दुसरा महाभियोग प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. दक्षिण कोरियातील संविधान न्यायालय याबद्दल निर्णय घेईल.
येओल यांनी ३ डिसेंबरला देशात आणीबाणी लागू केली होती. ही आणीबाणी काही तास टिकू शकली. दक्षिण कोरियाच्या इतिहासात पहिल्यांदाच आणीबाणी घोषित करण्यात आली होती. पण देशाच्या संसदेने एकमताने आणीबाणीची घोषणा केली. येओल देशात बंड करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांच्यावर झाला. यातून त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला.
पण पहिला प्रस्ताव अल्पमतांनी फेटाळण्यात आला; याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षाचे बहुतांश खासदार मतदानावेळी गैरहजर राहिले. शनिवारी संसदेने दुसरा प्रस्ताव दाखल करण्यात आला, यात प्रस्तावाच्या बाजूने २०४ खासदारांनी मतदान केले. दक्षिण कोरियाच्या संसदेत ३०० खासदार आहे, आणि महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्यासाठी २०० खासदारांचे पाठबळ लागते.
या सगळ्या गदारोळात राष्ट्राध्यक्षांविरोधात आणि समर्थनातही लोक रस्त्यावर उतरले आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे दररोज निदर्शने सुरू आहेत. या सगळ्या गदारोळात राष्ट्राध्यक्षाचे अप्रुव्हल रेटिंग निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.