भंडारा येथील एका ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट
सडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण
![Bhandara, ordnance, factory, explosion, SDRF, Nagpur, Municipal Corporation, Teams, Rescue, Operations, Calling,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/bhandari--780x470.jpg)
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील भंडारा येथील एका ऑर्डनन्स फॅक्टरीत मोठा स्फोट झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. कारखान्याच्या आरके शाखा विभागात हा स्फोट झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
कारखान्यात झालेल्या स्फोटाची छायाचित्रेही समोर येत असून, त्यात शस्त्रे बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जड साहित्याचे तुकडे आजूबाजूला विखुरलेले दिसत आहेत. स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट आकाशात दूरवर उठताना दिसत आहेत. त्याचवेळी, स्फोटानंतर कारखान्यात आग लागली, त्यामुळे अनेकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना शपथ
पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर असून ते मदतकार्यात गुंतले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात येत आहे. लोक सांगतात की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात घबराट पसरली आणि लोक इकडे तिकडे धावू लागले. घटनास्थळी स्थानिक लोकांची मोठी गर्दी जमली असून ते लोकांना वाचवण्यात मदत करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे
यात पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. एसडीआरएफ आणि नागपूर महानगरपालिकेच्या पथकांनाही बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले असून ते लवकरच पोहोचतील. जिल्हा प्रशासन संरक्षण दलांच्या समन्वयाने बचाव कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
सकाळी 10:30 ते 10:45 च्या दरम्यान कारखान्यात 14 कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कारखान्यात 14 कर्मचारी काम करत होते. गंभीर जखमी अवस्थेत चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांशिवाय अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.