breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

बेताल अब्दुल सत्तारांचा तमिळनाडूत निषेध ; राष्ट्रवादीचे ‘जोडो मारो’ आंदोलन

चेन्नई : तब्बल ७ वेळा संसदरत्न असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या बेताल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात चेन्नई येथील कोयमबेडू स्टेशन चौकात तामिळनाडू चे प्रदेश अध्यक्ष पी.के.नरेश कुमार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहर अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून त्याला जोडे मारले गेले. “अब्दुल सत्तार हाय हाय”,
“अब्दुल सत्तार डाऊन डाऊन” “५० खोके एक दम ओके” या घोषणा दिल्या गेल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्येकर्ते उपस्थित होते.
इम्रान शेख म्हणाले की, मंत्री अब्दुल सत्तार यांना सत्तेचा माज आला आहे. संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल बोलण्याची त्यांची लायकी नसून.तुमची सत्ता ही नेहमी राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिला.आधी काँग्रेसशी गद्दारी करून शिवसेनेत प्रवेश केला,मग शिवसेनेशी गद्दारी करून मंत्री पद मिळवलं. ज्या दिवशी तुम्ही शिवसेना सोडली त्या दिवशी तुमच्या मतदार संघातून तुम्ही तुमचा जनाधार गमावला.तुमच्या अश्या बेताल वक्तव्य पाहून इथून पुढे तुमच्या घरातील महिला देखील तुम्हाला मत देणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.अब्दुल सत्तार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी करत नैतिकतेचा टिळा लावणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्काराची गोडवे गाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ED सरकार या बेताल भाषा बोलणारे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेते का याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष ठेऊन असल्याची टीका त्यांनी केली.


तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष पी. के. नरेश कुमार म्हणाले की मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दलची भाषा वापरली ती भाषा भारतीय संस्कृतीला शोभणारी नसून त्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे कोणीही आमच्या नेत्यांना अशी प्रकारची भाषा वापरल्यास आज तामिळनाडूमध्ये फोटोला जोडे मारो आंदोलन घेत आहोत उद्या महाराष्ट्रात येऊन जोडे मारायला आम्ही कमी करणार नाही इशारा त्यांनी दिला.
तामिळनाडू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी.के.नरेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहराचे युवक अध्यक्ष इम्रान शेख, जी. राज्य सचिव अनिथा राज्य सचिव नादना सबपथी, युवक अध्यक्ष एसडीएच राजन, चेन्नई दक्षिण जिल्हा अध्यक्ष राजू,चेन्नईचे दक्षिण पूर्व अध्यक्ष शिवशंकर, NYC TN उपाध्यक्ष जया कुमार, युवक कार्यकारी समिती सदस्य सूर्य प्रकाशम, युवक सचिव रघु, युवक सरचिटणीस वेधा कृष्णन आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button