breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

बासमती तांदळाच्या दरात १० टक्के वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात भारताने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत १२०० डॉलर प्रति टन वरून ९५० डॉलर पर्यंत कमी केल्यानंतर, तुर्कस्तानमधील अनेक मोठे खरेदीदार बासमती तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतात आले आहेत, परिणामी निर्यात बाजारात किंमती ९७५-१००० डॉलर प्रति टन पर्यंत वाढल्या आहेत. हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या बासमती भात पिकासाठी प्रति क्विंटल ३९०० रुपये मिळत आहेत.

जागतिक बाजारपेठेतील मोठ्या मागणीमुळे एका आठवड्यात ७०० रुपये प्रति क्विंटलची वाढ झाली आहे. आतापासून एका महिन्यात  किंमती आणखी १०% वाढतील अशी अपेक्षा आहे. बासमती तांदळाच्या एकूण १.७ मिलियन हेक्टर क्षेत्रापैकी १५०९ जातीचा वाटा सुमारे ४०% आहे. २०२२-२३ मध्ये बासमती तांदळाची निर्यात ४.५ मिलियन होती, याचे मूल्य ३८,५२४.११ कोटी रुपये होते, आखाती देश हे प्रमुख खरेदीदार होते.

हेही वाचा – एल्विश यादव याच्या समर्थनार्थ शिव ठाकरे मैदानात; म्हणाला.. 

भारतात उत्पादित बासमती तांदळाच्या ८०% पेक्षा जास्त निर्यात केली जाते. “प्रति टन १२०० डॉलरच्या खाली असलेल्या किमतीमुळे जुने करार रद्द करण्यात आले होते. बासमती निर्यातदार आणि ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय सेटिया म्हणाले की, नवीन ऑर्डर येत आहेत आणि तुर्कस्तानमधून मोठे खरेदीदार बासमती तांदूळ चांगल्या प्रमाणात घेण्यासाठी भारतात येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button