breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

आपला बासमती जगात भारी! जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल

Basmati Rice | भारतीय बासमती तांदूळ हा जगातील सर्वोत्तम तांदूळ ठरला आहे. जगातील सर्वोत्तम ६ तांदळाच्या वाणांच्या यादीत भारताच्या बासमती तांदळाला पहिलं स्थान मिळालं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. आता भारतीय बासमती तांदूळ ‘नंबर १’ ठरला आहे.

फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्ट ॲटलसने जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत भारतीय बासमती तांदळाला प्रथम स्थान दिलं आहे. टेस्ट ॲटलसने २०२३-२४च्या वर्षअखेरीस यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा   –   ‘मोदींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पुढे ढकलावा’; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदन यांचं आवाहन

टेस्ट ॲटलसने बासमती तांदळाबाबत पोस्टमध्ये लिहिलं आहे की, बासमती हा मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेली आणि लागवड केली जाणारी लांब आकाराच्या तांदळाचा प्रकार आहे. या तांदळाचे वैशिष्ट्य त्याच्या चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे. एकदा शिजल्यावर, याचे दाणे वेगळे राहतात आणि एकमेकांना चिकटत नाहीत. चांगले आणि सर्वोत्तम बासमती दाणे किंचित सोनेरी रंगाचे असतात.

जगातील सर्वोत्कृष्ट तांदळाची यादी :

  • बासमती : भारत
  • अरबोरियो : इटली
  • कॅरोलिनो : पोर्तुगाल
  • बोम्बा : स्पेन
  • उरुचिमाय : जपान.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button