एप्रिल महिन्यात तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद! RBI कडून यादी जाहीर
![Banks will be closed for 14 days in the month of April](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Bank-Holiday-780x470.jpg)
Bank Holidays in April | मार्च महिना संपायला अवघे काहीच दिवस बाकी आहेत. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिलमध्ये बँकांना किती दिवस सुट्टी असणार याबाबतची यादी जाहीर केली आहे. एप्रिलमध्ये तब्बल १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ही यादी एकदा तपासणे गरजेचे आहे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
RBI कडून यादी जाहीर
१ एप्रिल २०२४ – संपूर्ण देशभर बँका राहणार बंद
५ एप्रिल २०२४ – तेलंगणा, जम्मू, श्रीनगर
७ एप्रिल २०२४ – रविवारमुळं बँका राहणार बंद
९ एप्रिल २०२४ – बेलापूर, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी, श्रीनगर
हेही वाचा – Pune | लोकसभा निवडणुकीसाठी ४७ हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक
१० एप्रिल २०२४ – कोची आणि केरळ
११ एप्रिल २०२४ – गंगटोक, चंदीगढ आणि कोची वगळता सर्व देशात बँका बंद
१३ एप्रिल २०२४ – दुसरा शनिवार
१४ एप्रिल २०२४ – रविवार
१५ एप्रिल २०२४ – गुवाहाटी आणि शिमला
१७ एप्रिल २०२४ – बेलापूर, भोपाळ, अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगढ, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, कानपूर, जयपूर, रांची शिमला, लखनो, मुंबई आणि नागपूर
२० एप्रिल २०२४ – आगरतळा
२१ एप्रिल २०२४ – रविवार
२७ एप्रिल २०२४ – चौथा शनिवार
२८ एप्रिल २०२४ – रविवार