breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
सुट्ट्यांमुळे डिसेंबरमध्ये बँका ११ दिवस बंद राहणार
नवी दिल्ली – या वर्षातील शेवटच्या डिसेंबर महिन्यात बँकांना ११ दिवस सुट्टी आहे. त्यामुळे त्यांचे कामकाज बंद राहणार आहे. या सुट्ट्या वेगवेगळ्या विभागांत वेगवेगळ्या दिवशी आहेत.
डिसेंबरमधील पहिली सुट्टी ३ तारखेला आहे. या दिवशी सेंट फ्रांसिस जेव्हियर पर्व दिन आहे. त्यामुळे गोव्यात बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर ५ डिसेंबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे. ११ आणि १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि रविवार आहे. १८ डिसेंबरला शिलॉंगमध्ये बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. १९ डिसेंबरला रविवार आहे. २४ डिसेंबरला शिलॉंगमध्ये बँका बंद राहतील. २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी आहे. २६ डिसेंबरला रविवार आहे. म्हणजे २५ आणि २६ डिसेंबरला २ दिवस बँका बंद राहतील. त्यानंतर ३० आणि ३१ डिसेंबरला शिलॉंगमध्ये बँकांना सुट्टी आहे.