Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
पॅन कार्डच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक असा रोखा गैरप्रकार!
![Bank fraud like fraud can be done through PAN card](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Pan-Card-780x470.jpg)
Pan Card | पॅन कार्डला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र पॅन कार्डचा गैरवापर करून फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पॅनचा वापर करून परस्पर कर्ज देखील काढले जाऊ शकते. त्यामुळे पॅनचा गैरवापर होणार नाही यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.पॅन कार्डचा गैर वापर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पॅन कार्डचा गैरवापर रोखण्याची पद्धत
- क्रेडिट स्कोअर रेटिंग वेबसाइटला भेट द्या.
- येथे पॅन कार्ड तपशीलांद्वारे तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा.
- तुमच्या नकळत तुमचे पॅन कार्ड कुठे वापरले गेले आहे, हे या वेबसाइट्सवरून तुम्हाला कळेल.
- याशिवाय कमी क्रेडिट स्कोअर हा देखील गैरवापराचा मोठा इशारा आहे.
हेही वाचा – सावधान! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुण्यासह काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
पॅन कार्डच्या गैरवापराची तक्रार कशी करावी?
- सायबर क्राईम पोर्टलवर पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल तक्रार दाखल करा.
- याशिवाय तुम्ही स्थानिक पोलिसांकडे जाऊन तक्रारही करू शकता.
- तुम्हाला पॅन कार्डशी संबंधित काही समस्या असल्यास, इन्कम टॅक्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.येथे तळाशी जा आणि तक्रार विभाग उघडा.
- तुमची तक्रार लिहा आणि फॉर्म सबमिट करा.