Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
यूएईमध्ये रमजानच्या इफ्तार पार्टीवर बंदी
![Ban on Ramadan Iftar party in UAE](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/ramzan.jpg)
अबुधाबी – जगभरात पुन्हा कोरोना पसरू लागला आहे. यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरात या आखाती देशामध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या संसर्गामूळे मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. रमजान महिन्यात मुस्लीम बांधव घर आणि कार्यालयात इफ्तारची पार्टी आयोजित करत असतात.मात्र राष्ट्रीय आपत्कालीन संकट आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार अशा सार्वजनिक इफ्तार पार्टीवर बंदी घातली. तसेच दुसर्याच्या घरी जावून अन्न वाटप करण्यासही मनाई केली आहे. जर एकाच घरातील लोक मात्र असे एकमेकांना अन्न वाटप करू शकतात असे प्राधिकरणाने म्हटले आहे.