breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फ्लोरिडात कोरोना अँटीबॉडीज घेऊन जन्मलं बाळ

वॉशिंग्टन – अमेरिकेतच्या फ्लोरिडामध्ये एक बाळ जन्माला आलं आणि अवघ्या जगात आनंदी आनंद झाला. कारण हे बाळ जन्माला आलं ते कोरोनाच्या अँटीबॉडीज घेऊनच. जन्मतःच कोरोनाच्या अँटीबॉडीज असलेलं हे जगातील पहिलं बाळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बाळाची आई आरोग्यसेविका आहे. तिने गरोदर असताना मॉडर्नाची लस घेतली. ती 36 आठवड्यांची गरोदर असताना तिने डोस घेतला होता. तिच्यामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज नाळेमधून बाळापर्यंत पोहोचल्या. जानेवारीमध्ये तिने सुदृढ मुलीला जन्म दिला. या बाळामध्ये जन्मतःच कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.

दरम्यान, या बाळाच्या आईच्या धाडसाचंही कौतुक होत आहे. कारण तिने बाळ जन्माला येण्याच्या काहीच दिवस आधी ही लस घेण्याची तयारी दाखवली. तसेच कोरोनाच्या अँटीबॉडीजसह जन्मलेल्या या बाळामुळे पुढची पिढी कोरोना फ्री जन्माला येण्याची एक आशा निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button