Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan: पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये दाखल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/PM-Narendra-Modi-1.jpg)
लखनौ: ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचलेले आहेत. अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून आज (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 44 मिनिटांच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्लीतून अयोध्येकडे रवाना झालेले आहेत. ते तासाभरात म्हणजे साडेदहाच्या सुमारास लखनौमध्ये दाखल झालेले आहेत..