breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
अमेरिकी कॅपिटॉलमध्ये मोटार घुसवण्याचा प्रयत्न
![Attempt to drive a car into the US Capitol](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/US-Capital.jpg)
नवी दिल्ली |
अमेरिकी कॅपिटॉलमध्ये शुक्रवारी दुपारी एक भरधाव मोटार अडथळे तोडून घुसल्याने दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. हा एक कथित हल्ला मानला जात असून पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले आहे. कॅपिटॉलच्या तपासणी द्वाराजवळ हा कथित घातपाती प्रकार घडल्याचे कॅपिटॉल पोलिसांनी सांगितले. कोणीतरी संशयिताने भरधाव मोटार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर घातली. त्यात दोन अधिकारी जखमी झाले. या प्रकारानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला फडणवीसांच उत्तर; म्हणाले, “त्यांना तर….”