‘एएसआय’ने केला महिला पोलिसाचा विनयभंग, अकोला पोलीस मुख्यालयातील प्रकार
अकोला : स्वाक्षरी देण्यासाठी आलेल्या महिला पोलिसाचाएका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात देण्यात आली. ही घटना शनिवारी अकोला पोलीस मुख्यालयात घडली. पण एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही, तर त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबतही वाद घातला. अखेर ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
स्वाक्षरी देण्यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळी तक्रारदार महिला पोलीस कर्मचारी ही अकोला पोलीस मुख्यालय कार्यलयात जात असते. मात्र पोलीस मुख्यालयात संलग्नित करण्यात आलेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ‘त्या’ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग होईल, अशा पद्धतीने वारंवार कृती करत असल्याने दुसरा पोलीस कर्मचारी त्यास समजावण्याचा प्रयत्न करीत असताना तू कोण मला सांगणारा, असे म्हणून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यांन, परिणामी जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या वादा दरम्यान कार्यालयतील खुर्ची तुटली. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यान तक्रार दिली आहे. तसेच महिला पोलीस कर्मचारी हिने सुद्धा विनयभंगाची तक्रार दिली आहे. पोलीस वर्तुळात चर्चा विषय आहे.
‘त्या’ एएसआय’नंकडून पोलिसांत तक्रार
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांच्या स्वाक्षरी घेण्यासाठी कर्तव्यावर हजर असताना, कुठलेहि कारण नसताना या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी वाद घातला. आणि धक्काबुक्की केली, अशा स्वरूपाची तक्रार कोतवाली पोलिसात दिली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू
तिघांचे तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाले आहेत, सदर प्रकरण वरिष्ठांकडे पाठवून चौकशी सुरु केली. चौकशीअंती निर्णय घेवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडु यांनी म्हटले.