असानी चक्रीवादळात समुद्रमंथन, सापडला रहस्यमय सोन्याचा रथ
![Asani cyclone churning the sea, found a mysterious golden chariot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/clipbodsbrard10sfa_202205819221-1.jpg)
नवी दिल्ली : देशात सध्या अनेक समुद्रकिनारी असानी चक्रीवादळाचा (Cyclone Asani)प्रभाव पहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. अशात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीकाकुलम भागात वादळामुळे समुद्रात उसळलेल्या लाटांमध्ये सोन्याचा रथ (Gold Coloured Chariot) वाहून आला आहे. हा रथ कुठून आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
श्रीकाकुलम जिल्ह्यात सुन्नापल्ली तटावर मिळाळा रथ
मिळालेल्या माहितीनुसार, हा सोन्याचा रथ श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली किनाऱ्यावर सापडला आहे. म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडमधून वाहून हा रथ इथपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. एसआय नौपाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हा रथ दुसऱ्या कोणत्या तरी देशातून आला असावा. आम्ही गुप्तचर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली असून याचा अधिक तपास सुरू आहे.’
स्थानिक नागरिकांनी दोरीने रथाला बाहेर काढलं
या रथाला सोन्याचा थर लावण्यात आला आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे समुद्राच्या लाटांच्यामध्ये हा सोन्याचा रथ तरंगत आहे. स्थानिकांनी या रथाला दोरीने बांधून बाहरे काढलं आहे.
असानी चक्रीवादळाच्या धोक्यामुळे ५० पथकं तैनात
आसानी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाने (NDRF) एकूण ५० टीम बाधित भागात तैनात केल्या आहेत. हवामान खात्याने अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, हे चक्रीवादळ ११ मेच्या दुपारपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात काकीनाड-विशाखापट्टणम किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.