breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

apple चा 13 इंचाचा नवीन MacBook Pro लाँच

टेक्नोलॉजीमधील दिग्गज कंपनी अॅपलने लॉकडाऊनमध्ये आपला १३ इंचाचा नवीन मॅकबुक प्रो लाँच केला आहे. अॅपल मॅकबुक प्रो शिवाय कंपनीने मॅजिक की बोर्ड बाजारात लाँच केला आहे. अॅपलच्या १३ इंच मॅकबुकमध्ये इंटेलचे १० वे जनरेशनचे प्रोसेसर देण्यात आला आहे.

अॅपलने लाँच केलेल्या MacBook Pro ची किंमत भारतात १,२२,९९० रुपये आहे. तर याच MacBook Pro ची किंमत अमेरिकेत १२९९ डॉलर म्हणजे ९८ हजार ३०० रुपये आहे. नवीन मॅकबुक प्रोची विक्री लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नवीन मॅकबुक प्रो मध्ये इंटेलचा १० वे जनरेशनचा क्वॉडकोर प्रोसेसर दिला आहे. ज्यात जास्तीत जास्त स्पीड ४.१ जीएचझेड आहे. याची स्पीड जुन्या मॅकबुकच्या तुलनेत २.८ पट अधिक असल्याचा कंपनीचा दावा आहे. जुना मॅकबुक मध्ये ड्युअल कोर प्रोसेसर देण्यात आला होता.

MacBook Pro च्या डिस्प्ले विचार केला तर या मॅकबुक प्रो मध्ये १३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन ६ के पर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात १६ जीबी आणि ३२ जीबी रॅम असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. तर २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे. याची टॉप व्हेरियंट म्हणजेच ३२ जीबी रॅम आणि ४ टीबी स्टोरेज आहे. यात थंडरबोल्ट ३, यूएसबी-सी आणि हेडफोन जॅक देण्यात आला आहे. तसेच यात टचआयडी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. स्पीकरमध्ये यात जुन्या मॅकबुक प्रमाणे वाइड स्टिरियो स्पीकर देण्यात आला आहे. यात मॅजिक की बोर्ड देण्यात आला आहे. याआधी आलेल्या मॅकबुक मध्ये सुद्धा हा की बोर्ड देण्यात आला होता. नवीन मॅकबुकमध्ये तुम्हाला ४के व्हिडिओ सुद्धा एडिट करता येऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button